दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेडब्रेकिंग

तालंग येथील सरपंच पदी गोदावरी बाई गिरी तर उपसरपंच पदी संदिप गोविंदराव मिराशे पाटील यांची गावकऱ्यांच्या वतीने बिनविरोध निवड 

 

………………………….
तालंग ता. हदगाव जिल्हा नांदेड येथे सरपंचाची व सर्व ग्रामपंचायत सदस्यांची गावकऱ्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली त्या नंतर दिनांक . ६/ १/२०२३ आज रोजी उपसरपंच पदी कोणाची वर्णी लागणार या कडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष्य लागले होते नवनिर्वाचित सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने विचार करून मा.प.स.सदस्य शिवसेना बंडु पाटील मिराशे यांचे बंधू संदिप गोविंदराव मिराशे यांच्या नावाला एकमताने संमती दिली व उपसरपंच पदी त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली,
निवडीनंतर सर्वांनी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊ प्रतिमेचे पूजन केले. नंतर बंडु पाटील मिराशे व खंडू पाटील निर्मल यांनी ग्राम पंचायत मध्ये राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करुन प. स. विस्तार अधिकारी टारपे साहेब, सरपंच गोदावरीबाई गिरी, उपसरपंच संदीप मिराशे, ग्रामसेवक जयस्वाल साहेब, सर्व नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्य यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार घालून अभिनंदन केले, तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जास्तीत जास्त गावचा विकास व्हावा लोकांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही सर्वजन प्रयत्नशील राहल अशी अपेक्षा व्यक्त केली व पुढील कार्यास नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांना गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य हदगाव बंडू पाटील मिराशे यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले कारण पंधरा वर्षे पासून ग्रामपंचायत निवडणुकीत आपण आम्हाला आपल्या आशीर्वाद देत आहात त्याबद्दल मी सर्वांच्या ऋणात राहील गावाच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्न शील राहील व सर्व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांचा बंडू पाटील मिराशे यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास करून शुभेच्छा दिल्या

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

प्रभु साहेबराव कदम वाघीकर दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी

दैनिक देशरत्न न्युज पत्रकार प्रभू कदम वाघीकर बातम्या देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करा +918411985876

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे