दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

औरंगाबादब्रेकिंग

गंगापूर येथील पोष्ट ऑफिसला ध्वजारोहणाचा पडला विसर…. !

गंगापूर प्रतिनिधी।गंगापूर येथील पोष्ट ऑफिसला ध्वजारोहणाचा पडला विसर अगोदर छोटासा ध्वज तिरका फडकवला तक्रारी नंतर शासकीय ध्वजारोहणाच्या नंतर तब्बल दोन तासाने नियमांचे उल्लंघन करत ध्वजारोहण करणा-या अधिका-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा गंगापूर तालुक्यातील ३९ पोष्ट ऑफिस पैकी अनेक पोष्ट मास्तरने ध्वजारोहण केले नाही यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान देशभरात हर घर तिरंगा उपक्रम राबविला जात आहे . स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा व क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सरकारी पोस्ट ऑफिसमधून झेंड्याची विक्री केली आहे. 27 बाय 18 इंच आकाराचा झेंडा 25 रूपयांत पोस्ट कार्यालयात उपलब्ध झाला आहे. यंदा तिरंगा पोस्टाच्या पोर्टलवरून ऑनलाईन देखील अनेकांनी खरेदी केला आहे. या सर्व गोष्टीची माहिती व जाणीव पोष्ट ऑफिसच्या पोष्ट मास्तर व कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाच्या आचारसंहितेची माहिती असुन देखील त्यांनी जाणुन बुजून अनेक पोष्ट ऑफिस मध्ये ध्वजारोहण केले नाही यामध्ये रघुनाथ नगर येथील पोष्ट ऑफिसला तर ध्वजारोहण केलेच नाही अशा अधिकाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतवासियांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे