
गंगापूर: गुरुवार दिनांक ९ जून २०२२ रोजी गंगापूर तालुक्यातील मांजरी गावामध्ये मोफत ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यासाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने लाभार्थीचे ई-श्रम साठी नोंदणी करण्यापासून तर ई-श्रम कार्ड वाटप अगदी मोफत करण्यात आले.
मांजरी गावात आज ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले, यावेळी कार्यक्रम प्रसंगी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक दिनेश मांगीराज यांनी दोन वर्षांपासून मॅजिक बस अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा लेखा जोखा मांडला. मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या अंतर्गत जॉब कार्ड, ई-श्रम कार्ड, शासकीय वेगवेगळ्या योजना, आय सी आय फाऊंडेशनच्या वतीने कुक्कुटपालनसाठी वाटप करण्यात आलेले कोंबड्या, कोंबडी खाद्य, दाळ मिल मशीन त्याच बरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गर्शन शिबिर कार्यक्रम, किशोरवयीन मुलांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या अंतर्गत जीवनकौशल्य खेळामार्फत विद्यार्थांपर्यंत पोहचावे यासाठी करण्यात आलेले कार्य व विद्यार्थ्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल या विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक दिनेश मांगीराज, उपजीविका अधिकारी सचिन थोरात, जीवनकौशल्य अधिकारी बाळासाहेब पिसाळ, आय सी आय फाऊंडेशनचे सोपान पाटील, समुदाय समनव्यक असिफ शेख, अंजली ताई कसाने (सरपंच), उपसरपंच मधुकर काका साळवे, ग्रामस्थ अशोक भाऊ सुम्ब, आणि सर्व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.