दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

युवकाचा अपघाती मृत्यु – वारसांना ३२ लाख रुपये नुकसान भरपाई मंजुर

प्रतिनिधी  : मयुर मांडलिक पत्रकार ( देशरत्न न्युज) 

अहमदनगर – कोकणगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील अपघातामध्ये मृत्यु झालेल्या युवकाच्या वारसांना ३२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश अहमदनगर येथील मा. मोटार वाहन अपघात न्यायाधीकरण साहेब यांनी नुकताच पारित केला.

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीगत –

मौजे कोकणगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील युवक अमोल बोरुडे हा मिरजगाव येथील सरकारी दवाखान्यासमोर रस्त्याच्या डाव्या बाजुने पायी जात असताना त्यास भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. सदर अपघातामध्ये अमोल यास जबर मार लागला. अमोल याच्यावर सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुदैवाने उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. सदरच्या अपघाताबाबत ट्रक चालकाचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन येथे भा.द.वि कलम ३०४(अ), २७९, मो.वा.कायदा कलम १८४, १३४(अ) (ब) व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दरम्यान मयत अमोल बोरुडे याचे कायदेशीर वारस पत्नी, अज्ञान मुलगा व आईवडील यांनी अहमदनगर येथील मा. मोटार वाहन अपघात न्यायाधीकरण यांचे कोर्टामध्ये मोटार वाहन कायदा कलम १६६ अन्वये नुकसान भरपाई मिळण्याकरीता दावा दाखल केला. सदरच्या दाव्याची नुकतीच गुणदोषावर सुनावणी झाली. अर्जदारांचे माहितगार वकीलांनी मयत अमोल हा खाजगी वाहन चालक असल्याबाबत पुरावे सादर केले. मा.ना. सर्वोच्च न्यायालयाकडील वाहन चालकाच्या किमान उत्पन्नाबाबत सायटेशन सादर केले. अर्जदार यांचा लेखी व तोंडी पुरावा तसेच मा. ना. सर्वोच्च न्यायालयाकडील न्यायनिवाडा या बाबी ग्राह्य धरुन अहमदनगर येथील मा. मोटार वाहन अपघात न्यायाधीकरण साहेब यांनी मयत अमोल बोरुडे यांचे कायदेशीर वारसांना व्याजासहीत सुमारे ३२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच पारित केला.

 

अर्जदारांचे वतीने ॲड. प्रशांत मोरे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. देवा थोरवे, ॲड. सुभाष वाघ, ॲड. अंशाबापु पुंड, ॲड. एच. डी. सपकाळ, ॲड. स्नेहल सरोदे व ॲड. सविता शिंदे, ॲड. उन्मेश चौधरी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे