अहमदनगर प्रतिनिधी (२१ नोव्हेंबर):-अनाथालयातील तरूणीवर शिर्डी येथील हॉटेलमध्ये कामाला असलेल्या तरूणांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी जळगावच्या दोन तरूणांना अटक केली आहे.त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सखोल तपासासाठी बुधवार (ता. २३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.अहमदनगर शहरातील एका अनाथालयात राहत असलेली तरूणी रागाच्या भरात जुलै महिन्यात शिर्डीला निघून गेली होती. ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर,उपअधीक्षक ग्रामीण विभाग अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेटी देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले होते.सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरूणांनी या तरूणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हे तरूण जळगाव जिल्ह्यातील असून ते शिर्डीमध्ये राहत होते.त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशीसाठी न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींचे नावे प्रसिध्द करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ब्रेकिंग
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
ब्रेकिंग
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
ब्रेकिंग
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
December 27, 2025
धनमुद्रा अर्बनतर्फे लोहा शाखा येथे नववर्ष कॅलेंडर वाटप व योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न…
November 11, 2025
नजिक चिंचोली जी प प्रा शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची सर्वानुमते निवड
July 28, 2025
शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षणाला सुरुवात…
July 10, 2025
श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आनंदउत्सवात साजरा
March 14, 2025
तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
January 26, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 3, 2025
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
December 30, 2024
पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
August 20, 2024
जिजामाता विद्यालय पालक-शिक्षक संघच्या अध्यक्षपदी प्रियंका काळे
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
Related Articles
Check Also
Close



