दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये चार दिवसीय तक्षज्ञ करंडक स्पर्धा उत्साहात संपन्न

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये चार दिवसीय तक्षज्ञ करंडक स्पर्धा उत्साहात संपन्न

राहुरी : (प्रतिनिधी राहुल बोरुडे) येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स आरडगाव येथे वेदांता फाउंडेशनचे अध्यक्ष मा. बाबासाहेब मुसमाडे यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय तक्षज्ञ करंडक स्पर्धाचे आयोजन दिनांक 15/11/2022 ते 19/11/ 2022 रोजी करण्यात आले होते.

वेदांता फौंडेशनच्या तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये चार दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन मा. म्हसे सर (माजी प्राचार्य ज्ञानेश्वर महाविद्यालय टाकळीमिया) व मा.अमोल बानकर ( इंडियन आर्मी) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये क्रिकेट, धावणे, रिले 200 मी,व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, रस्सीखेच, गोळा फेक, स्लो सायकल, रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, चेस कॅरम,आर्चरी, भालाफेक ,गोळा फेक तक्षज्ञ आनंदनगरी ,पारंपारिक वेशभूषा, वकृत्व, हस्ताक्षर अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये यावर्षीचा2022चा तक्षज्ञ करंडक सायन्स आणि कॉमर्स या शाखेने जिंकला. दोन्ही शाखेने सायन्स 470 व कॉमर्स 470 पॉईंट घेऊन यावर्षीचा तक्षज्ञ करंडक आपल्या शाखेच्या नावावर कोरला. त्यासाठी सायन्स शाखेच्या हेड प्राध्यापिका गौरी सूर्यवंशी व कॉमर्स शाखेचे हेड प्राध्यापक अफरोज सय्यद यांनी मुलांना मार्गदर्शन केले .जिंकण्यासाठी चांगली रणनीती आखली. शेवटपर्यंत चुरशीची स्पर्धा तक्षज्ञच्या विद्यार्थ्यांना ,रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्रा. राहुल बोरुडे यांनी चार दिवस तक्षज्ञ करंडकचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल प्राचार्य जगदीश सर व प्रशासन अधिकारी महेश सर यांनी कौतुकाची थाप दिली व आभार मानले.
तसेच सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे खेळाडू तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजच्या चार दिवसीय तक्षज्ञ करंडक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. तक्षज्ञ व सुजाता कॉलेजमध्ये कबड्डी ,रस्सीखेच ,धावणे ,क्रिकेट ,रीले यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी खेळाडू वृत्तीने स्पर्धा पार पडल्या.
तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जगदीश मुसमाडे, प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे, क्रीडा प्रमुख राहुल बोरुडे व सर्व स्टाफने स्पर्धेचे आयोजन केले होते.
त्यावेळेस उपस्थित कॉलेजचे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. सागर वाघ, प्रा संतोष आनाप, प्रा. सुरज तनपुरे ,प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा. गौरी म्हसे, प्रा. प्रियाली दरंदले- मुसमाडे,प्रा.सोनाली शिरोळे, प्रा. अश्विनी खिलारी, प्रा. स्वाती कोबरने, शिक्षकेतर कर्मचारी हेड क्लार्क सलीम पठाण, आकाश बोर्डे, अमोल पवार सर्व उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे