खोकर येथे श्री राम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवास उद्या पासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने वाल्मिकी रामायण कथा ऐकण्याचा योग भाविकांना होणार आहे.
खोकर येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवास उद्यापासुन प्रारंभ
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळातील खंडानंतर प्रथमच खोकर मधे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास उद्यापासुन मोठ्या उत्साहात सुरवात होत आहे.श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री वाल्मिकी रामायण कथा, कीर्तन व अन्नदान या सोहळ्यात होणार आहे.
जिल्ह्यात प्रथमच वाल्मिकी रामायण कथा
आतापर्यंत परीसरात सर्वत्र तुलसी रामायण कथाचे आयोजन झालेले आहे परंतु प्रथमच आचार्य डॉ.शुभम महाराज कांडेकर यांच्या वाणीतुन वाल्मिकी रामायण कथा ऐकण्याचा योग भाविक भक्तांना येणार आहे.
श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन
२ वर्षानंतर प्रथमच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण होत असुन या पवित्र ग्रंथ पारायणासाठी प्रत्येक घरातुन कीमान एका व्यक्तीने तरी सहभाग घ्यावा असे आवाहन ह.भ.प. साहेबराव महाराज कागुणे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले.
श्रीराम मंदीर व हनुमान मंदीरावर तरुण परीवाराच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई केली असुन या रोषणाईने मंदीराची भव्यता वाढली आहे.
या सोहळ्यात सकाळी ७ ते ११ पारायण, दुपारी अन्नदान,सायं.०५ते ०६ हरिपाठ ,रात्री ७:३० ते १०:३० रामायण कथा असे कार्यक्रम होणार असुन या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम तरुण परीवाराने केले आहे.