हंडीनीमगाव शिवारात थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले. शासन निर्णयानुसार तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्याचे आदेश दिले, त्यानुसार हंडीनिंमगाव मध्ये दोन दिवसापासून तलाठी बांगर मॅडम,मदतनीस चंद्रकांत सकट, कुणाल पिसाळ थेट शेतात जाऊन नुकसान पाहणी करून पंचनामे करत आहेत,मागच्या वर्षी देखिल तलाठी मॅडम थेट शेतात जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे केले होते त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
आज हंडीनिमगाव मध्ये पाहणी करायला आले असताना तलाठी बांगर मॅडम,चंद्रकांत सकट, कुणाल पिसाळ, मनुभाऊ जाधव,शिवाजी जाधव,किशोर जाधव,बाळासाहेब जावळे,रमेश जाधव,गणपत जाधव, बाळासाहेब पिसाळ,आकाश पिसाळ, सोपान रोडगे आदी शेतकरी उपस्थित होते