दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून, खंडणी वसूल करणाऱ्या रंगेहाथ पकडले….!जिल्ह्यातील घटना…

राहुरी प्रतिनिधी। शहरातील तालुका अधिकारी कार्यालयात काल (गुरुवारी) राहुरी पोलिसांनी सापळा लावला. कृषी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून, वेळोवेळी खंडणी वसूल करणाऱ्या एका व्यक्तीला शासकीय पंचांसमक्ष दोन हजारांची खंडणी वसूल करतांना रंगेहाथ पकडले.त्याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.इब्राहिम फत्तूभाई शेख (रा. देवळाली प्रवरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पत्रकार नसताना तो तसे भासवून मिरवत होता. माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगत होता. आरोपी शेख तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे व देवळाली प्रवराचे मंडळ कृषी अधिकारी राहुल ढगे यांना तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करीत होता. तालुका कृषी अधिकारी ठोकळे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना मोबाईलवरील खंडणी मागणीच्या ध्वनिफितींसह तक्रार अर्ज दिला.
त्यावरून, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, कॉन्स्टेबल विकास साळवे, सचिन ताजणे, रोहित पालवे, रवींद्र कांबळे, शशिकांत वाघमारे यांच्या पथकाने दोन शासकीय पंचांसमक्ष आरोपीला दोन हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.
ठोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, “पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगून, शेख याने वेळोवेळी फोनवर व समक्ष भेटून पैशांची मागणी केली. तुम्ही पैशाचा अपहार केला आहे. तुमचा अपहार मी उघडकीस आणील. तुमच्याविरुद्ध उपोषण, आत्मदहन करील, अशी धमकी दिली “इमानेइतबारे काम करत असल्याचे सांगून, कोणताही अपहार केला नाही. असे वेळोवेळी सांगितल्यावर त्याने खोटेनाटे तक्रार अर्ज देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. नाईलाजाने त्याला तीन हजार रुपये दिले. नंतर प्रत्येक महिन्याला दोन-तीन हजार रुपये घेऊन जाऊ लागला. ९ मार्च २०२१ रोजी त्याने सिमेंट खरेदीसाठी पंधरा हजारांची मागणी केली. त्यावेळी त्याचा मुलगा अझर इब्राहीम शेख त्याच्या मोबाईलवर सहा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.” असेही फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व नागरिकांना कोणीही इसम अनाधिकाराने कोणत्याही स्वरुपाची खंडणी मागत असल्यास तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे