ब्रेकिंग
राष्ट्रीय जंतनाशक दिन तेलकुडगाव उपकेंद्र येथे साजरा…..
मुंबई प्रतिनिधी।राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा , व हायस्कूल येथे वाटप केल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कुकाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक डॉक्टर विजय चिलगर यांनी मुलांना जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व पटवून दिले . जंतूपासून बचावासाठी हात धुवा व हात धुण्याचे पद्धती समजावून सांगितल्या. त्यावेळी घाडगे पाटील विद्यालयचे प्रशासक आद . श्री . राऊत मॅडम , कराड सर , महेश घाडगे सर , संदिप घोडेचोर सर व आरोग्य सेविका कांबळे मॅडम, CHO खवल सर , आशा सेविका सविता घोडेचोर , शोभा इंगोले , संगिता साळवे , शुभांगी घाडगे आदि उपस्थित होते.