नेवासा प्रतिनिधी-बाळासाहेब पिसाळ
नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव सुरेशनगर येथे असलेले प्राचीन प्रभू रामचंद्र च्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या स्वयंभु त्रिवेणीश्वर येथे त्रिवेणीश्वर महादेवाचे प्राचीन व स्वयंभू शिवलिंग आहे दरवर्षी येथे श्रावण महिना व महाशिवरात्री च्या दिवशी उत्सवात सुरु होते,
दोन वर्षे कोरोना काळानंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच उत्सवात महाशिवरात्री सोहळा उत्सवात साजरा होत आहे त्यासाठी 27 तारखेला नामदार शंकरराव गडाख व त्रिवेनांनंद सरस्वती व विविध संत महंत व राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झाला आहे उद्या महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी आपलं योगदान दिले आहे विविध मान्यवरांनी महाप्रसाद ची पंगत घेतल्या आहेत व संतपूजन ची सेवा देखील घेतल्या आहेत,
देवस्थान चे मठाधिपती महंत रमेशानंद गिरी महाराज यांनी सर्व भाविकांना मदतीचे व सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे