दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील घटना…उपसरपंचानेच केली चक्क १०० टन उसाची चोरी…!दोन दिवसाची पोलीस कोठडी

नेवासा प्रतिनिधी। अलीकडे चोरटे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,डाळिंब यासह विविध पिकांची चोरी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यातील चोरी करणारे देखील भुरटे चोरटे अथवा सराईत गुन्हेगार असल्याचे अनेकदा समोर आले आहे.परंतु उपसरपंचानेच एका शेतकऱ्याचा चक्क १०० टन उसाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील लांडेवाडी शिवारातील दोन लाख रुपये किमतीच्या १०० टन उसाची चोरी केल्याप्रकरणी लांडेवाडी येथील उपसरपंचास सोनई पोलिसांनी अटक केली आहे.लांडेवाडी शिवारातील साडेतीन एकरातील सोळा महिन्याचा शंभर टन उस हार्वेस्टरने तोडून ट्रक व ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेल्याची फिर्याद भरत जाधव यांनी सोनई पोलिस ठाण्यात दिल्यानंतरपंचनामा करून जवळच्या शेतकऱ्यांचा जवाब घेतल्यानंतर लांडेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पद्माकर दरंदले, ऋषिकेश संजय दरंदले,रवींद्र हारदे व बबन पद्माकर दरंदले या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपसरपंच दरंदले यास लांडेवाडी येथील एका वस्तीवरुन अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार झाले असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे