शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान भरपाई साठी वंचित चे नंदिनी नदीकाठी ठिय्या आंदोलन…
प्रतिनिधी।शामराव काळपुंड
शेवगाव प्रतिनिधी।शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गेल्या महिन्यात प्रचंड अतिवृष्टी झाली त्यामध्ये अनेक शेतकरी बेघर झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, पशुधन, शेतातील पिके, घरे, गोठे वाहून गेले. शेतातील पिके पूर्ण वाहून गेली, यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पाणी पुसण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी गावोगावी भेटी घेतल्या आणि फोटो काढले, बातम्या जाहिराती देऊन भेगडी देखावा येथील लोक प्रतिनिधी कडून केला गेला, एक महिना पूर्ण होऊन देखील शासनाकडून दमदीचीही मदत पीडित शेतकरी व पूरग्रस्तंसाठी मिळाली नाही या निषेधार्थ वंचित चे महाराष्ट्र राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली निषेध व्यक्त करून भव्य ठिय्या आंदोलन नंदिनी नदीकाठी करण्यात आले, यावेळी चव्हाण सर म्हणाले की, महविकास आघाडी सरकार चे मंत्री आणि नेते पूरग्रस्त भागात भेटी देऊन फोटो आणि बातमी प्रसिध्दी केल्या, पण खऱ्या अर्थानं आर्थिक मदत एक दमडी ही केली नाही या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध आहे. सदर चा मोर्चा शेवगाव येथील शासकीय विश्रामगृह पासून शेवगाव शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून नगर मार्गे वरील नंदिनी नदीकाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी अरविंद सोनटक्के, भोरू मस्के, शेख प्यारेलालभाई विशाल मगर, मधुकर सरसे, रवींद्र सर्जे, रवींद्र निळ, पीर महंमद शेख, कैलास चोरमले, लहू साबळे, विठ्ठल मगर राजेंद्र चव्हाण डॉ अंकुश गायकवाड सुनिता जाधव प्रीतम गरजे अन्सारभाई कुरेशी इतरही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .