ई-पेपर
काँग्रेसच्यावतीने कंधार बंदची हाक….
कंधार प्रतिनिधी।उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खीरी येथील झालेला हिंसाचाराविरोधात कंधारातील सत्ताधारी पक्षांनी म्हणजेच राष्ट्रवादी, शिवसेना तसेच काँग्रेसच्या वतीने आज 11 ऑक्टोबरला कंधार बंदची हाक दिली आहे. अनेक व्यापारी संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होत कंधार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या आघाडी सरकारने “वारे मोदी तेरा खेल, सस्ता खून महंगा तेल” असे नारे देत कंधार शंभर टक्के यशस्वी बंद पाडण्यात आले. व राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत फुके यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील ज्या गृहमंत्र्यांच्या मुलाने गाडी अंगावर घालून बळीराजाला चिरडल्यामुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून काही खूप प्रमाणात जखमी झाले आहे. त्या मंत्र्यांच्या मुलाला कठोर शासन झाले पाहिजे असे सांगितले.