मुंबई। एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी दि. 8/11/2021 पासून बेमुदत संपावर गेले आहेत.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरच निर्णय घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडून माञ आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच दौंड आगारातील आठ कामगारांना दि. 10/11/2021 पासून निलंबित केले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे एसटी प्रशासन व सरकार यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. आगारातील त्यांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे अन्यथा आमचेही निलंबन करावे अशी सर्व कामगारांनी भूमिका घेतली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व कामगारांनी दिला आहे. यामध्ये कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून तिव्र असंतोष निर्माण झाला आहे यामुळे एखाद्या कामगाराने नैराश्यातून परत आत्महत्या केली किंवा काही बरे वाईट झाले तर यास एसटी प्रशासन व सरकार जबाबदार राहतील व सदरचे आंदोलन विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले.