दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

आरटीओ ने कारवाई केलेला ट्रक चोरानी दौंड एस.टी डेपोचे गेट तोडून नेला चोरून….

प्रतिनिधी।गणेश गायकवाड

दौंड प्रतिनिधी। दौंड मध्ये अवैद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेल्या वाहनांना दौंड एस टी डेपो मध्ये लावले जाते . त्या वाहनाचा मालक दंडाची रक्कम आर.टी. ओ विभागामध्ये जमा करत नाही तो पर्यंत ते वाहन एस.टी डेपो मध्ये ठेवले जाते . दंड भरलेली पावती दाखूनच दौंड एस टी डेपो मधील वाहने सोडण्यात येतात .
डेपो मध्ये ही या वाहन किती दिवस आहेत त्या दिवसा पासून ते वाहन सोडे पर्यंत किती दिवस होतील त्या दिवसाचे भाडे आकारले जाते . चोरीला गेल्याल्या वाहना विषय सविस्तर माहिती अशी की MH.12 AR 3829
या क्रमांकाची गाडी दौंड एस टी डेपो मध्ये कारवाई दरम्यान जमा केला होता सदर ट्रक ०४/१०/२०२१ रोजी २.३० वा दौंड आगारातून चोरीला गेले आहे .त्याची फिर्याद ०९/१०/२०२१ रोजी ५.१२ वाजता दिली आहे.
ही फिर्याद नवनाथ ज्ञानदेव काळे दौंड एस टी डेपो सेक्युरिटी गार्ड यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. तर नामदेव बापू शिंदे रा.गिरीम ता.दौंड जिल्हा पुणे असे संशयित आरोपीचे नाव असून अजुन एका अन्यात व्यक्ती ने त्याला मदत केली आहे .चोरी गेलेला माल ४,००,०००/ चा एक हिरव्या रंगाचा त्यावर पैलवणाचे चित्र असलेला ट्रक चोरी गेला आहे या विषयी अधिक तपास पोसई गोसावी सो. पोलीस हवालदार गावडे ,प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद घुगे हे करत आहेत .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे