ब्रेनट्युमरची मोफत शस्त्रक्रिया, गृहमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब याचे कुटुंबियांकडून आभार…
धनंजय मेंगडे पुणे प्रतिनिधी
पुणे प्रतिनिधी।निरगुडसर (आंबेगाव ) वडील पेंटिंग काम करणारे ,आई भाजी पाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते मुलाला ब्रेनट्युमर या महाआजाराने ग्रासले होते,कुटुंबासमोर खूप मोठी अडचण उभी होती.या वेळी त्यांच्या साठी देवमाणूस उभे ठाकले.राज्याचे गृहमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. कु.किरण पंकज सरोदे, वय 12 वर्ष ,या लहान मुलावर पुणे येथे शस्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी 4 लक्ष रुपये खर्च सांगितला , घरची परिस्थिती बिकट असल्या कारणाने कुटुंबाला खर्च परवडणारा नव्हता, आशा वेळी राज्याचे गृहमंत्री, नामदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेब, यांच्या सूचनेनुसार त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली,या कामी खऱ्या अर्थाने ज्यांची मदत झाली ते श्री.रामदास वळसे सर, शरद बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात, अनुसया उन्नती केंद्राच्या संचालिका सौ.मायाताई देठे सर्वांचे सरोदे कुटुंबीयानी मनापासून आभार व्यक्त केले !!