मुंबई प्रतिनिधी।मोठ्या प्रमाणात सतत ढगफुटी मुळे कोसळत असलेल्या मूसळधार पावसाचा जोरदार तडाखा जांब, सावरगाव परिसराला बसला असून सतत पङणारा मूसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून हाता तोंडाशी आलेला सोयाबीन . कापूस .उडीद .मुग.ज्वारीसह आदी पिकांचा .घास या रोजच्या रोज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पीकांचे दिवसेंदिवस मोठे नुकसान होत असून हातातोंडाशी आलेला नुकसानितून राहिलेला घास हिरकावला जात आहे . मूसळधार पावसाचा जोरदार तडाखा जांब सावरगाव सर्कल परिसराला बसला असून या भागातील संपूर्ण सिंचन.पाझर.साठवण तलाव ओव्हर फूल झाल्या मुळे पुराचे पाणी शिवारात शिरल्यामुळे पिकां सह माती खरडून जात असून खरीप हंगामातील हाता तोंडाशी आलेले पिके पुराणे वाहून जात असून सतत च्या पावसामुळे पिकांना संपुर्ण नुकसान पोचल आहे शेतकरी हवालदिल झाला आहे..
या भागातील जांब दापका कामजळगा मंग्याळ -सावरगाव सांगवी सह आदी गावच्या फुलावरून पाणी वाहत होते..
कामजळगा या गावचा पुल खाली पङल्याने पुल खचल्याने गावातील लोकांचा इतर गावचा येण्या जाणाचा संपर्क सतत तूटत आहे नंदीला सतत पुर वाहत आहे.लवकरात लवकर मोठा पुल करण्याची गावकर्याची मागणी होत आहे.. जांब ते सुगाव जाणारे नदीतील पाणी सतत शेतात पुरपङी होऊन नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे कामजळगा मंग्याळ गावा जवळून ती नदी सुगावला जाते.. जांब सावरगाव सर्कल परिसरात गेल्या दोन तीन दिवसापासून सतत पाऊस पङून घरांची पङझङ पण मोठ्या प्रमाणात झाली आहे..
हस्त नक्षत्रातील पहिल्या चरणातील पाऊस हा कापूसा सह खरीप हंगामातील पिकासाठी हाणीकारक असतो त्यामुळे उत्पादनास मोठी फटका बसला आहे .त्यातच २७ सप्टेंबर च्या सायकाळपासून आज दुपार पर्यंत सतत मूसळधार पावसाचा तडाखा बसल्याने या भागातील संपूर्ण खरीप हंगामा तील पिके पाण्याखाली आला असून मुग.उडीद .सोयाबीन .कापूस .ज्वारी तूर. सह आदी पिकांचे अतीपावसामुळे हाता तोंडाला आलेल्या पिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याने शेतकरी हाताश झाला आहे .याकङे प्रशासणाने तसेच कंपणीने लवकरात लवकर आङचणित सापङलेल्या बळीराजाला मदत करण्याची मागणी होत आहे..या भागातील रस्ते.फुलं व शेतकऱ्यांची शेती पिकांसह अति पाऊसामुळे जमिन खचून गेली आहेत .शासनाने तात्काळ पहाणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदती सह पीक विमा तात्काळ मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.