दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

गंगाधर जारीकोटकर आणि राजेश मनुरे यांच्या मार्फत राबविला कोविड-१९ चा उपक्रम

दिनेश दारमोड प्रतिनिधी

धर्माबाद।कोरोना सारख्या जागतिक महामारीचा परिणाम देशातील विविध सण व उत्सवावर दिसून येत आहे.त्यामुळे शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आले.या अंतर्गत धर्माबाद तालुक्यात व शहरात सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धर्माबाद तालुक्यात व शहरात लसीकरण करण्यात येत आहे.
दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी त्रिरत्न बौध्दविहार इंदिरानगर धर्माबाद. येथे गंगाधर जारीकोटकर मा. बांधकाम सभापती न.प. धर्माबाद,राजेश मनुरे माजी नगरसेवक व मित्र परिवार,वतीने कोरोना प्रतिबंध लस बद्दल जनजागृती करून कोविड-१९ चा उपक्रम म्हणून लसीकरण शिबिर आयोजित केल आहे.असून यामध्ये विविध पक्ष,समित्या, व सामाजिक कार्यकर्त्यांकडून लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येत आहेत. तसेच नागरिकांनीही सुद्धा संभाव्य तिसऱ्या लाटेला लक्षात घेऊन लस घेण्यास भर द्यावी. या मोहिमेसाठी लसीकरणची संख्या वाढविण्यात आली आहे.या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख इकबाल यांनी सांगितले व लसिकरणाबाबतची माहिती कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती नागरीकांपर्यंत त्या मोहिमेअंतर्गत पोहचविले आहे.
वैद्यकीय अधिकरी डॉ.शेख इकबाल, वैद्यकीय अधिकरी डॉ.लक्ष्मीनारायण केशटीवार,वैद्यकीय अधिकरी डॉ. विभुते म्याडम , राम बोईनवाड संगणक ऑपरेटर, नितीन आडे रजिस्टर नोंदणी,पल्लवी वाघमारे सिस्टर, गौतम कैवारे आरोग्य विभाग,रूक्‍माजी भोगावर न. पा. कर्मचारी यांनी एकदम नियोजन बद्ध लसीकरण व कोरोना चे सर्व नियम पाळून लसीकरण करवून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अभिनंदन केले. गंगाधर जारीकोटकर मा. बांधकाम सभापती न.प. धर्माबाद,राजेश मनुरे माजी नगरसेवक व मित्र परिवार,वतीने त्रिरत्न बौध्दविहार इंदिरानगर धर्माबाद . येथील कोरोना प्रतिबंधक लस शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्या सेंटर वर इंदीर नगर, रसिक नगर नागसेन परिसर व इतर भागांतील नागरिकांनी लसीकरणासाठी उत्फुर्स सहभाग नोंदवला आहे. या कोविड-१९ चा उपक्रम लसीकरण शिबिरा मध्ये कोविड-१९ ची पाहिली लस केरबा वाघमारे यांना देण्यात आली. या कोविड-१९ लसीकरण शिबिरा मध्ये जवळपास
१३४ च्या वर लाभार्थ्याने लसीकरण करण्यात आले.
सदर लसीकरण कॅम्प यशस्वी करण्याकरिता
रमेश तिवारी माजी नगराध्यक्ष, जे.के. जोंधळे ता. सल्लागार वंचित बहुजन आघाडी, सदानंद देवके अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पत्रकार राहुल वाघमारे,गंगाधर अवधूते सामाजिक कार्यकर्ते, दिगंबर मिसाळे सामाजिक कार्यकर्ते, निर्वाण सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते,भगवान घाटे, दिगांबर कदम, दत्ता कांचने, प्रल्हाद देवके सर ,धनराज ससाने, सुनील लोहबंदे, राहुल सोनकांबळे, अशोक भालेराव,दीपक वाघमारे, महिलांमध्ये उपस्थिती जमनाबाई चौदंते, सुमनबाई वाघमारे,अस्मिता वाघमारे, रेखाबाई अवधूते, सावित्रीबाई मदने, माधाबाई सूर्यवंशी व युवा पत्रकार समिती ( YPS ) चे पदाधिकारी, इंदीर नगर येथील नागरिक सर्व उपस्थित होते.
सर्व नागरिकांनी गोंधळ न करता या मोहिमेत यशस्वी रुपी सहभाग नोंदविला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे