केंद सरकारची महत्वपूर्ण ई-श्रम योजनेचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यावा- सज्जन दत्तात्रय सिरजखोडकर
दिनेश दारमोड प्रतिनिधी
धर्माबाद। सध्या देशभरामध्ये केंद सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी म्हणजेच घरगुती कामे करणाऱ्या महिलांसाठी, व सुतार ,गवंडी,सलून चालक ,मालक ,लोहार,प्लंबर, मेस्त्री, भाजीवाले ,व चहा विकणारे असे अनेक बाराबलुतेदार समाजातील असंघटित कामगार वर्गासाठी ही योजना आहे.भविष्यात शासकीय अनुदान खात्यात जमा होण्यासाठी सर्व कामगार मग ते कोणतेही कामगार असो त्यांना मिळणार श्रमिक कार्ड त्यांच्या आधारे सरकार सबंधींत व्यक्तीला त्या बाबतीत सरकारी योजनेचा लाभ देण्यात येईल, व श्रमिक कार्ड योजनेअंतर्गत सरकारी दप्तरी असंघटित कामगारांची नोंद होणार आहे.
येणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सामील केले जाईल, येणारी सरकारी कामे सुद्धा दिली जातील यासाठी ज्यांचे पीएफ खात्यामध्ये मध्ये जमा होतात व त्यांची इन्कमटेक्स भरतात आशा कामगारांना या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही. व लाभार्थी साठी ह्या व या कार्ड साठी लागणारे कागदपत्रे आधारकार्ड, व बँक पासबुक, कामाचा व्यवसाय व कामाचा तपशील इत्यादी या योजनेसाठी लाभ मिळवण्याकरता इत्यादी कागदपत्रे लागतील व तुम्ही कोणतेही काम करत असेल तर (उदा) सुतार,शिंपी सलून चालक ,मालक लोहार ,गवंडी, मेस्त्री, प्लंबर, नळ फिंटींग,भाजीपाला वाले ,चहा विकणारे,इत्यादी इतर काम करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात सदर योजना अगदी सोपी आणि सुलभ आहे व या योजनेसाठी नाभिक समाजातील व बाराबलुतेदार संघातील संघटनेनी या योजनेसाठी पाठपुरावा करत होते. तरी सर्व असंघटित कामगारांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि ही माहिती जास्तीत जास्त ईतर समाज बांधवापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करावे.असे आव्हाअन अखिल भारतीय जिवा संघटनेचे ता .अध्यक्ष सज्जन दत्तात्रय सिरजखोडकर यांनी करण्यात आले आहे.