*स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमीत्त नेवाशात आझादी गौरव पदयात्रा*.
प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर
*स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमीत्त नेवाशात आझादी गौरव पदयात्रा*.
*देशभक्ती गितासह घोषणेने नेवासा नगरी दुमदुमली.*
(नेवासा प्रतिनिधी) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमीत्त नेवासा तालुक्यात काँग्रेस कमिटीकडून आझादी गौरव पद यात्रा काढण्यात आली. सविस्तर वृत्त असे १५ऑगस्ट २०२२ हा दिवस भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा स्वातंत्रदीन, यानिमित्त संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे.देशातील नागरिकांकडून तसेच विविध पक्षाकडून वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून यानिमित्त संपूर्ण देशभर आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात देखील काँग्रेस कमिटीकडून देखील तालुक्यांत भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रेत देशभक्ती पर गीत, घोषणा, तसेच ठिकठिकाणी कॉर्नर सभा, घेण्यात आल्या. यावेळी दिलेल्या घोषणांनी नेवासा शहर परिसर दणाणून गेला. मार्केट यार्ड येथून निघालेली ही पदयात्रा खोलेश्वर गणपती मंदीर, मोहिनिराज मंदीर, ते औदुंबर चौक अशी काढण्यात आली होती, औदुंबर चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सभेमध्ये विविध मान्यवरांनी स्वतंत्र मिळविण्यासाठी थोर नेत्यांनी केलेले महान कार्य, दिलेले बलिदान, गेल्या पंचाहत्तर वर्षात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशासाठी दिलेले योगदान याविषयी माहिती दिली . यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी बोलतांना स्वातंत्र मिळाल्यानंतर देशासमोर असंख्य आव्हाने उभी होती . पुरेसे अन्नधान्य, उद्योग, कारखाने, आरोग्य सुविधा, शैक्षणीक सुविधा, वीजनिर्मिती, वाहतूक सुविधा, उपलब्ध नव्हत्या. सरंजामशाहीतून देशाला मुक्त करणे आव्हानात्मक होतें या अडचणीवर मात करून काँग्रेस पक्षाने एका मजबूत भारताचा पाया घातला. शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी देशात काँग्रेसने नागरिकांना कामाचा अधिकार दिला, भुकेल्यानाना अन्नाचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, तसेच माहितीचा अधिकार दिला, परंतु गेल्या आठ वर्षांत देशातील तरूण बेरोजगारीचा सामना करत आहे, महागाई गगनाला भिडल्याने जनतेचे जगणे अशक्य होत आहे, जनता त्रस्त झाली आहे, परंतु सध्याचे सरकार राष्ट्रवाद समोर आणून सर्व गोष्टींवर पांघरून घालत आहे अशी टीकाही केंद्र सरकारवर केली. जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे यांनी काँग्रेस सरकारने लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली परंतु गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारने देशाची प्रगती, सामाजिक एकोपा, आकांक्षा, अपेक्षा, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, जीएसटी , नोटबंदी नावाखाली छोटे उद्योग व्यवसायावर हल्ला केला, अर्थव्यवस्था बुडाली , महागाई वाढली, अन्नधान्यवर जीएसटी लावून गोरगरिब नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ या सरकारनं आणली. महीला अध्यक्ष शोभा पातारे यांनी काँग्रेस पार्टीने देशासाठी दिलेले योगदान, तसेच केंद्र सरकारने संविधान धोक्यात आणले असुन यासाठी परत क्रांती करण्याची वेळ आली आहे अशी टीका केली. या आझादी गौरव पद यात्रामधे काँग्रेसचे सुदामराव कदम, संदीप मोटे, सचिनभाऊ बोर्डे, चंद्रशेखर कडु, कमलेश गायकवाड, संजय होडगर, अंजुम शेख, गोरक्षनाथ काळे, आकाश धनवटे, मीराताई वडागळे, शोभा बोर्गे, ज्योती भोसले, राणीताई भोसले, ललिता केदारे, अर्चना बर्डे संतोष बर्डे, सौरभ कसावणे यांच्यासह नेवासा तालुका काँग्रेस कमिटी सदस्य , महीला काँग्रेस कमिटी सदस्य, शहर काँग्रेस कमिटी सदस्य ,युवक काँग्रेसचे सदस्य, जिल्हा काँग्रेसचे सदस्य यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. शहरातली मार्केट यार्ड पासून निघालेली यात्रेची औदुंबर चौक येथे जाहीर सभा घेण्यात येवुन सांगता करण्यात आली. *चौकट* :- *पुन्हा क्रांती करण्याची वेळ आली*. देशाची सध्याची परिस्थिती बेरोजगारी, महागाई, अर्थव्यवस्था, अन्नधान्यावर जीएसटी, देशाची संपत्तीची विक्री, केंद्रिय संस्थांचा गैरवापर, शेतकरी – कामगार दुर्व्यवस्था, संविधान धोक्यात आले आहे ही परिस्थिती पाहता आता पुन्हा क्रांती करण्याची वेळ आली यात जनतेने सहभागी व्हावे व देश वाचवावा अन्यथा कधी आपल्या देशाची कधी श्रीलंका होईल सांगता येत नाही. :- संभाजी माळवदे अध्यक्ष, नेवासा तालुका काँग्रेस कमिटी