शिकाऊ परीचारीकेच्या मृत्यु प्रकरण वडिलांची सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी : मयुर मांडलिक
यवतमाळ येथे शिकाऊ परीचारीकेच्या मृत्यु प्रकरण वडिलांची सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तुपटाकळी येथील रहिवासी असलेल्या निकिता कैलाश राऊत या प्रशिक्षणार्थी चा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित विभागाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली या बाबत प्राप्त माहितीनुसार तुपटाकळी येथील निकिता कैलास राऊत ही यवतमाळ येथे शासकीय रुग्णलयांमध्ये असणाऱ्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रामध्ये 2022 ला प्रवेशित होती सदर प्रशिथनाने वसतिगृहात असताना अचानक पणे चार दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली प्रशानाच्या दिरंगाई आणि दुर्लक्षितपणामुळे सदर परीचारीकेचा अंगामध्ये ताप मुरला व तिची तब्येत बिघडली असे असतानाही सदर वसतिगृहाची असणारी वॉर्डन यांनी कुठल्याही प्रकारची सूचना तिच्या नातेवाईकांना दिल्या नाही तब्येत जास्त बिगडल्यावर दि 5 रोजी दुपारी तीन च्या दरम्यान कॉल केला आणि आपल्या मुलीची तब्येत जास्त बिगडली आहे तिला घेऊन जा अश्या प्रकारचा मेसेज दिला रोज मजुरी करणाऱ्या वडीलासमोर याचा प्रश्न उभा राहिला आणि थोड्या वेळानंतर कळले की अतिदक्षता विभागात निकिताला भरती करण्यात आले वडील शासकीय रुग्णलयांमध्ये येईपर्यंत निकिताची प्राणज्योत मावळली होती

