ब्रेकिंग
ज्याची जाहिरात नाही त्याची बातमी नाही असा मूलमंत्र जपला तर पत्रकार बांधवांची होणारी हेळसांड थांबेल!!
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष श्री अवधूत खाडे

तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील प्रत्येक पत्रकार यांच्या व्हाट्सअप वर एक मेसेज वारंवार करत आहेत मेसेजचा विचार करून तरी पत्रकार बांधवांनी जागृत व्हावे ही अपेक्षा.
मी श्री अवधूत खाडे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघतालुका
आध्यक्ष हदगाव, पत्रकार बांधवानो जाहिरात न देणाऱ्या लोकांच्या बातम्यांना न्याय देऊ नये,प्रकाशित करणे टाळावे. “जाहिरात नाही तर बातमी पण नाही ” असा मूलमंत्रण घ्यावा! सर्वच काही राजकीय सामाजिक आणि अधिकारी मंडळी व संस्थेच्या मंडळाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संस्था वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन वेळोवेळी पत्रकार यांचा वापर करून घेतात परंतु दीपावलीच्या व वर्तमानपत्र वर्धापन दिनाच्या किंवा आवश्यक तेव्हा जाहिराती मागितली तर तुमचा पेपर कोणता आम्हाला फक्त चारच पेपर माहित आहेत बाकींना आम्ही ओळखत नाही,कारण सांगतात काही अधिकारी तर फोन घेणे सुद्धा टाळतात.” बातम्या छापायच्या आणि जाहिरात द्यायची नाही… वारे दुनिया” अशाच मानसिकतेच्या लोकांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्यांनी जाहिरात दिली नाही त्याची वर्षभर बातमी छापूने टाळावे ज्या प्रतिनिधींना पत्रकारांना जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर यापुढे असा लोकांच्या बातम्या देण्यात टाळले तर याचा निश्चित चांगला परिणाम होईल यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्याच्या संस्थेला संघटनेच्या सत्काराचा पुरस्काराच्या बातम्या अजिबात छापून नाही हीच भूमिका पत्रकार बांधवांनी घेण्याची गरज आहे. पत्रकारिता करणे कमालीचे झाले आहे बातम्या प्रसिद्धी करून ही पत्रकाराला जर अपयशाचा वाटा स्वीकारावा लागत असेल तर सर्वच मीडियाची एकजूट राहणे गरजेचे आहे विचार करा कृती करा व सदर मेसेज सर्व पत्रकारापर्यंत पोहोचवा अशी प्रत्येक पत्रकाराच्या व्हाट्सअप वर पत्रकार मित्राने त्यांचे मनातील खदखती एसएमएस द्वारे मांडत आहे म्हणून सांगतो सर्व पत्रकार बांधवांनो आता एकजुटीने या आणि एकच नारा ठेवा ज्याची “जाहिरात नाही तर बातमी नाही”.
आपलाच
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष
श्री अवधूत खाडे
9130708500,. 9730708500