आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा निवडणूक भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांचे प्रचाराचे नारळ महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आले.
बाळासाहेब पिसाळ
आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा निवडणूक भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांचे प्रचाराचे नारळ महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आले.
..यावेळी नेवासा तालुक्यातील दडपशाही मोडीत काढण्यासाठी व घराणेशाही संपून लोकशाही राज्य निर्माण करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने भारतीय जनता पार्टीच्या व शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन विखे यांनी केले.
आज केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यावेळी बोलताना महसूल मंत्री विखे म्हणाले.
नेवासा तालुका म्हणजे कार्यकर्त्यांची फौज असून त्यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,विठ्ठलराव लंघे, यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच नेवासा तालुक्यात विविध विकास कामाचा शुभारंभ व विविध काही कामाचा लोकार्पण सोहळा त्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयाची आपल्या सरकारने मंजूर केलेली घोडेगाव पाणी योजना ,नेवासा तहसील नवीन इमारतीचा लोकार्पण, नेवासा नगरपंचायत अंतर्गत शॉपिंग कॉम्प्लेक्स लोकार्पण व नवीन कॉम्प्लेक्स भूमिपूजन ,शिरसगाव मधील कोट्यावधी रुपयाची कामाचे भूमिपूजन व काही कामाचे लोकार्पण या आणि अशा अनेक कामाची भूमिपूजन व लोकार्पणअसा एक दिवसाचा जम्बो उद्घाटन सोहळा नेवासा तालुक्यात लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना दिले कार्यकर्त्यांनी आता कुणाला घाबरायची गरज नाही सर्व तहसीलदार पोलीस निरीक्षक व सर्व शासकीय अधिकाऱ्यांना कठोर निर्देश देण्यात आलेले आहे कुणावरही अन्याय अत्याचार व हुकूमशाही दादागिरी इथून पुढे खपून घेतली जाणार नाही अशी आश्वासन यावेळी बोलताना पालकमंत्री महोदयांनी दिले……………………………… भारतीय जनता पार्टीचे नेते व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते
यांच्या सर्वांच्या सहकार्याने नेवासा तालुक्यातील बाजार समितीमध्ये नक्कीच विजय प्राप्त करेल.
नेवासा बाजार समितीचे कोट्यावधीचे उत्पन्न गिळणकृत करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक मोठे गोडाऊन असून सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण मिळत नाही.ती सर्व गोडाऊन सत्ताधारी वैयक्तिक स्वार्थासाठी वापरतात ही मोठी शोकांतिका आहे. मी आत्ता आजपर्यंत नेवासा बाजार समिती मला कधी उघडी दिसलीच नाही… विकास काय असतो बाजार समितीचा हे पाहण्यासाठी एकदा राहता बाजार समितीचा आदर्श घ्या
राहता बाजार समितीच्या धर्तीवर शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे लगेच पेमेंट केले जाते,दैनिक स्वरूपात लिलाव केले जातील,व अनेक प्रकारचे शेतीमाल डाळिंब कांदा कापूस गहू हरभरा मका इत्यादी प्रकारचे खरेदी करण्यात येथे व मालाचे पेमेंट त्याच दिवशी शेतकऱ्यांना दिले जाते व शेतकऱ्याला डिजिटल पद्धतीने रोजचा बाजारभाव बाजार समितीमध्ये कळतो. असे प्रतिपादन महसूलमंत्र्यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर सर्व निवडणुकीत उभे राहिले उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी व्यासपीठावर श्री किसनराव गडाख पेशवे नितीन दिनकर.अंकुश काळे डॉ. बाळासाहेब कोलते प्रताप चीधे सचिन देसरडा संभाजी दहातोंडे ज्ञानेश्वर पेचे रविकांत शेळके मनोज पारखे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते