“जवळगाव येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ ”
एका घरातून ५० हजार रुपये रोख रक्कम व दोन ग्रॅम सोने नेले
हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील पांडुरंग नारायण रावते यांच्या घरात ३१ डिसेंबर रोजी रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी पाठीमागच्या दारातून घरात घुसून घरातील सामानाणी नासाडी करुन कपाटात ठेवून असलेले ५० हजार रुपये व दोन ग्रॅम सोने लंपास केल्याची घटना घडली. या घटने प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी अज्ञात चोराठ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक महाराज , पोलीस कर्मचारी नितीन राठोड, अविनाश कुलकर्णी यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता हिमायतनगर येथील जवळगाव येतील रहिवासी पांडुरंग नारायण रावते यांनी घराचा गिलावा करण्यासाठी जमा करून ठेवलेले व सोयाबीन विकुन पैसे घरात आणुन ठेवल्याची माहिती अज्ञात चोरट्यास कळतास त्यांनी ३१ डिसेंबर रात्री २ ते ३ या सुमारास घराच्या पाठीमागल्या दाराजवळ चोरट्यांनी सीडी लावुन घरात प्रवेश केला.त्यानंर घरात ठेवलेले ५० हजार रुपये व लहान बाळाचे दोन ग्रॅम सोने घेऊन लंपास झाले.यावेळी पांडुरंग नारायण राणे यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशन याबाबत माहिती कळवली असता तेथील पोलिस निरीक्षक श्री भुसनुर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महाजन, पोलीस कर्मचारी नितीन राठोड , अविनाश कुलकर्णी यांनी सकाळी ७ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास बिट जमादार पोटे हे करीत आहेत . पांडुरंग नारायण रावते यांचा मुलगा अक्षय पांडुरंग रावते हे एक भारतीय सैन्यात असुन त्याच्या घरी चोरी झाल्याचे कळताच जवळगाव येथील गावकऱ्यांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे.

