“त्या प्रकरणा विषयी हदगाव तहसिलदार यांना निवेदन…
"त्या प्रकरणा विषयी हदगाव तहसिलदार यांना निवेदन...."
- “त्या प्रकरणा विषयी हदगाव तहसिलदार यांना निवेदन….”
प्रतिनिधी :अवधूत खाडे
हदगाव तालुक्यांतील शासकीय आदिवासी आश्रम शाळा केदारगुडा येथील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता ४ वर्गात शिकणाऱ्या विश्रांती बाळू देशमुखे हिचा दुर्दैवी मृत्यूची कसून चौकशी करावी अशा मागणीच निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.(ता.३०/१२) .कारण एवढया कमी वयात एखादी नववर्षाची मुलगी आत्महत्या करेल असे वाटत नाही. हि फार संतापजनक घटना आहे त्यामुळे समस्त आदिवासी समाजा मध्ये तिव्र नाराजी पसरली आहे .त्यामुळे सदरील घटना हि घातपात असण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही ,म्हणून या घटनेची निपक्षपाती कसून चौकशी होणे गरजेचे आहे.कारण येथील शाळा व्यवस्थापनेत काम करणारे कर्मचारी यांची भूमिका संशयास्पद आहे.त्यांच्या हलगर्जीपणा आणि कामातील अनियमितपणा मुळे म .ना.सेवा १९७९ (शिस्त व अपील ) या नियमांचे भंग झाल्यामुळे त्यांच्याकडून एका निष्पाप मुलीस आपला जीव गमवावा लागला आहे. तेंव्हा तिच्या मृत्यू ला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून इतरही कर्मचारी गुन्ह्यात समाविष्ट असल्याचे नाकारता येत नाही,परंतू कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी यांना दोषी ठरवण्यात आले पण जे कायम आहेत ते मात्र दूरच आहेत हे मात्र विशेष…
म्हणून दोषी व्यक्तींना कडक शिक्षा देऊन पिडीत मुलीस न्याय मिळावा अशी मागणी पीडित मुलीच्या आई वडील समेत समस्त आदिवासी बांधवांसह तालुक्यातील समस्त बहुजन बांधवाची मागणी आहे.
यात प्रामुख्याने
मागण्या:-
१) या घटनेच्या १५ दिवस अगोदर आणि १५ दिवस नंतर मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल चे Call Deatails तपासण्यात यावेत.
२ )सदरील प्रकरण जलद गती न्यायालयात (Fast Track Court) चालून दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी .
३)शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्वकर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे
जर कोणी राहण्यास तयार नसेल तर त्यांचे आदिवासी विशेष उपयोजना अंतर्गत मिळणारा विशेष भत्ता (Tribal Allowance) आणि घरभाडे कायमचे बंद करण्यात यावे .
४ ) सदरील घटनेच्या दिवशीचे सी.सी.टीव्ही फुटेज संघटनेच्या पदाधिकारी यांना दाखवण्यात यावे .
५ ) महिला अधीक्षका यांचे पद कायम स्वरूपात भरण्यात यावे .
६ )वर्षातून तीन वेळा पालक मेळावे व विद्यार्थी यांच्यासाठी समुदेशन केंद्रामार्फत त्यांचे मार्गदर्शन करण्यात यावे.
७ )शाळेत वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करत एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी.८ ) शाळेतील सर्व विद्यार्थी यांचा किमान १० लाखाचा विमा काढण्यात यावा .
९ ) सदरील शाळा लवकरात लवकर सुरु होईल असे नियोजन करण्यात यावे जेणेकरून सर्व विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही .
१०) गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असू शकतात ,विद्यार्थी भीतीच्या वातावरणात राहू शकतात,त्यामुळे सर्व स्टॉप तात्काळ बदलण्यात यावा , त्या ठिकाणी तात्काळ नवीन स्टॉप रुजू करून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
—————————————————————–
म्हणून या प्रकरणी अति तात्काळ कारवाई करावी अशी मागणी उपस्थित पीडित मुलीचे आई वडील यांच्या वतीने करण्यात आली.. याकरिता आदिवासी सरपंच संघटना, आफ्रोट संघटना,आंध आदिवासी समाज संघटना,आखिल भारतीय विकास परीषद,राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद, राष्ट्रिय आदिवासी छात्र संघ, वंचीत बहुजन आघाडी, लहुजी शक्ती सेना, बहुजन मुक्ती मोर्चा, तसेच तालुक्यातून आलेले अनेक समाज बांधव, महीला, आदींची संख्या मोठ्या प्रमाणावर सक्रियतेने सहभागी होत्या…