दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

गुरू गौरव पुरस्काराने टिक्कल सन्मानित…..

प्रतिनिधी। दत्ता राशिनकर

नेवासा प्रतिनिधी।मुळा एज्युकेशन संस्थेच्या श्री शनिश्वर प्राथमिक विद्यालयाचे सोनई येथील शिक्षक गणेश टिक्कल यांचा अहमदनगर येथील पदमशाली समाज बांधवांच्या वतीने जाहीर केलेला गुरु गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला आहे.
नगरच्या मार्कडेय संकुल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मूतीचिन्ह देवून टिक्कल यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, युवानेते सचिन जगताप व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आल्यानंतर टिक्कल यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. याबद्दल मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख, डॉ. अशोक तुवर, सरपंच धनंजय वाघ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे