दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरब्रेकिंग

शेतीची मशागत करताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटर मध्ये गुतलेला चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर रोटाव्हेटर पडल्यामुळे दुदैवी मृत्यू

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक

संगमनेर प्रतिनिधी (२२ नोव्हेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारात शेतीची मशागत सुरु असताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटर मध्ये गुतंलेला चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर रोटाव्हेटर पडल्यामुळे त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ओझर खुर्द शिवारातील दत्तमंदिर परिसरात पुंजा धोडींबा शिदें (वय ३९) हा तरुण ट्रॅक्टरच्या साहय्याने शेतीची मशागत करत होता. यावेळी रोटाव्हेटर मध्ये चिखल गुंतल्यामुळे ट्रॅक्टर उताराला लावून तो रोटाव्हेटरचा चिखल काढत होता. यावेळी ट्रॅक्टर सरकल्याने रोटाव्हेटर थेट त्यांच्या छाती व पोटावर पडला.यावेळी स्थानिकानी पाहिले असता त्याठिकाणी धाव घेतली.इतर स्थानिक नागरीकाच्या मदतीने पुंजा शिदें याना संगमनेर येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले.परंतू उपचारापुर्वीचं त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरानी दिली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे