उद्या संगमेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ :-
महाराष्ट्रतील वारकरी संप्रदायतीच्या गुरुकुल शिक्षण पध्दतीतील एक गुरुकुल शिक्षण संस्थेचा शुभारंभ साधूसंतच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
आपल्या पाल्यला शैक्षणिक शिक्षनाचे धडे देत असताना आध्यत्मिकतेची पण जोड असंन काळारूपाने नितांत गरजेजे वाटायला लागले . म्हणूनच आम्ही आपल्या परिसरातील साधु संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुळा आणि प्रवरामाई संगमावरती (मेळ ,तिळापूर) श्री क्षेत्र संगमेश्वराच्या पावन भूमित गुरुकुल शिक्षण संस्था सुरू करत आहोत ..
आपल्या सर्वांचे आदरस्थ असलेले महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज व गुरुवर्य पुंडलिक महाराज जगले शास्त्री यांच्या शुभहस्ते ,
शुक्रवार दी 10 /6/2022 रोजी सकाळी 8:30 वा शुभारंभ करत आहे
त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायतील माझे सर्व गुरुबंधू उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रमास संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट व पंचक्रोशीतील वारकरी मंडळींचे मोठे योगदान असणार आहे आसे संगमेश्वर गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्रमुख ह.भ.प योगेश महाराज पवार यांनी सांगितले .