दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान व उपचार शिबीर*

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान व उपचार शिबीर

आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा या कार्यक्रमांमध्ये भेंडा येथे आज सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते

या शिबिरासाठी अनेक गरजवंत रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये बीपी थायरॉईड मधुमेह डोळ्यांचे आजार अशा प्रकारच्या आजाराचे निदान व त्यावरती औषध उपचार करण्यात आले

ज्या देशाचे आरोग्य चागंले तो देश निच्छीतच प्रगती करतो , माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत , सर्वात जास्त कोवीड लसीकरण झाल्याने आपण सुरक्षीत आहोत , तसेच जास्तीत जास्त लसीकरण करायचे आहे व नागरिकांना आरोग्याप्रती जागरुक बनवायचे आसल्याचे प्रतिपादन डाॅ.रजणिकांत पुंड यांनी केले

आजचे आरोग्य शिबीर हे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमीत्त आयोजीत केले त्यामुळे आजारी रुग्नांना चांगला फायदा मिळतो , गोर गरीब , दीन दलित समाजाला मोदीजींच्या योजनेतुन मोठा लाभ मिळाला , या सेवा पधंरवाड्यातील उस्थळ या ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबीरातुन जे रक्तदान झाले त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लघे पाटील म्हणाले ,

तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरुकटे म्हणाले की 17 सप्टेबंर हा देशाचे पतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस , आठ वर्षात मोदींजीनी गोर गरीब दीन दलितांसाठी , सर्वसामान्यांसाठी विविध योजनेच्या माध्यमातुन मोठे काम केले , भारता सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मोफत कोवीड लसीकरण केले , या पंधरवाड्यात आपल्याला मोदी सरकारच्या आठ वर्षातील विविध योजनाचा प्रचार प्रसार करायचा आहे , तसेच शिंदे – फडणवीस सरकारचा आरोग्य निधी उपलब्ध करुन देणे , शेतकर्‍यासाठी किसान सन्मान योजना आसेल , आशा योजनाची माहितीली जनते पंर्यत पोहचली पाहीजे ,

यावेळी भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील , तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी , भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रताप चिंधे, डॉ. लहानु मिसाळ , डॉ.संतोष फुलारी , डॉ विजय मुळे डॉ.रवींद्र आढाव , डॉ.रजनीकांत पुंड , डॉ.गवळी,डॉ.निकम शंकर , मंतोंडे देविदास पुंड शरद जाधव प्रतीक्षा शेजुळ , आकाश चेडे , येडूभाऊ सोनवणे , अण्णा पाटील , तुकाराम कन्हेरकर , देवेंद्र गव्हाणे , सुनील सांगळे , तुळशीराम काळे , गोरक्षनाथ कानडे , अशोक साबळे , संदीप गव्हाणे , संभाजी मिसाळ , संभाजी सोनवणे , विनायक मिसाळ , नवनाथ फुलारी , भाऊसाहेब शिरसाठ , अरुण मांजरे , सखाराम फुलारी , बाबासाहेब शिरसाट , आदि ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे