प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील दुभाजकानजिक उभ्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डंपरला कंटेनर धडकल्याने झालेल्या अपघातात दुभाजकावरील गवत काढण्याचे काम करणाऱ्या दोघा मजुरांसह कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
तसेच अन्य तीनजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातात रमेश भगवान माने वय 50, रा. बाभुळखेडा ता . नेवासा , ऋषिकेश संजय निकम (वय 25-रा. सलाबतपूर ता. नेवासा) व सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कंटेनर चालक दादा राजाराम खराडे (वय 30) यांचा मृत्यू झाला.
तर मेहबुब इब्राहिम शेख, संभाजी आसाराम वायकर व बाळासाहेब रघुनाथ पटेकर हे जखमी झाले.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्ता दुभाजकावर उगवलेले गवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मजुरांद्वारे काढून घेतले जात होते. काढलेले हे गवत भरुन नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा डम्पर दुभाजकानजिक नगरच्या दिशेने उभा केलेला होता
ज्ञानेश रोलिंग वर्क्स समोर उभ्या असलेल्या या डम्परवर औरंगाबादहून नगरच्या दिशेने जात असलेला भरधाव कंटेनर मागच्या बाजूने धडकला. दुभाजकावर गवत काढण्याचे काम करत असलेलेदोघे मजूर जागीच ठार झाले.