पाच लाख भाविकांचे शनिदर्शन, देश-विदेशातील भक्तांची हजेरी
प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
श्रावण महिन्याची समाप्ती व शनी अमावस्या एकाचवेळी आल्याने शनिशिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहातपार पडली. आज पाच लाखाहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. रात्री १२ वाजता पुणे येथील राहुल गोडसे, महेंद्र पारडे, पहाटे संभाजीनगर येथील माजी खासदार चंद्रकांत खैरे, दिल्लीचे मेहतांनी साहेब, ऑस्ट्रेलियाचे राकेश कुमार, दुपारी मुंबईचे शनिभक्त सौरभ बोरा, झिम्बाबेचे जयेश शहा, आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपट पवार यांच्या हस्ते आरती व विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी ओरिसाचे शनिभक्त नब किशोर दस यांच्या हस्ते आरती होऊन संकल्प केलेला सतरा लाखाचा कलश शनिदेवाला अर्पण करण्यात येणार आहे.शुक्रवारी रात्रीपासून भाविकांची गर्दी वाढत शनिवारी दिवसभर गर्दी होती. या निमित्ताने प्रवेशद्वार, मंदिर परिसर आदी ठिकाणी विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना भांडार प्रसादाचे शनि भक्तांकडून वाटप करण्यात येत होते. भावी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंग व्यवस्था घोडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयात, मुळा कारखानाच्या काही अंतरावर करण्यात आली होती. दिवसभरात ओरिसाचे शनिभक्त नब किशोरी दस, आ. जनक पटेल, आ. प्रफुल पनशेरीया, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, युवा नेते उदयन गडाख यांच्यासह अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले. गुजरातहून आलेले भाजपचे आ. जनक पटेल व आ. प्रफुल पनशेरीया यांचे भाजपचे नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, भाजप ओबीसी तालुका अध्यक्ष देविदास साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्वागत केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून यावेळी पाच लाखाहून अधिक भाविक आल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, विकास बानकर, पोपट शेटे, आप्पासाहेब शेटे, ऍड. सायराम बानकर, बाळासाहेब बोरुडे, आप्पा कुऱ्हाट आदि पदाधिकारी, कार्यकारी अधिकारी जी. के. दरदले व्यवस्थापनावर लक्ष ठेऊन होते. विशेष अतिथींचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते.