दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये, लायगरमधून पडद्यावर…

प्रातिनिधि-हर्षद तुकाराम यरवलकर

मुंबई।ज्याच्या बॉक्सिंगनं भल्या भल्यांना पाणी पाजलं. ज्याचं नाव काढताच बॉक्सिंग रिंगमधील अनेकांना घाम फुटायचा अशा माईक टायसनची कारकीर्द भलतीच वादळी होती. तो जसा त्याच्या खेळामुळे माहिती होता त्यापेक्षा एक वादग्रस्त बॉक्सर म्हणून जास्त ओळखला गेला. संबंध देशभरात त्याचे लक्षावेधी चाहते आहेत. आपल्या आक्रमक खेळानं त्यानं प्रतिस्पर्ध्यांला नॉक आऊट केलं होतं. टायसननं त्याच्या कारकीर्दित वेगवेगळे विक्रम केले. पंचांशी वादही घातला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तो कमालीचा लोकप्रिय झाला होता. आता तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या लायगर नावाच्या चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याविषयीची अधिक माहिती करण जोहरनं सोशल मीडियावरुन दिली आहे. ब़ॉक्सिंगमध्ये आपल्या खेळानं लोकप्रिय झालेला खेळाडू म्हणून आजही टायसनचे नाव घेतले जाते. तो पहिल्यांदाच बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याला बॉलीवू़डच्या काही चित्रपटांनी प्रभावितही केले होते. असे त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. करण जोहरनं आपल्या सोशल मीडियावरुन लिहिलं आहे की, भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदा बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो.लायगर हा चित्रपट स्पोर्टसवर आधारित आहे. त्यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांड़े यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर राम्या कृष्णन, चार्मी आणि रॉनित रॉय बोस यांनीही या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लायगरचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. माईक टायसननं 1985 ते 2005 मध्ये बॉक्सिंगचा बादशहा राहिला. त्याचा आर्यन माईक आणि किड डायनामाईट या नावानं गौरव झाला होता. त्यानंतर त्याला द बेडेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट या पुरस्कारानंही गौरविण्यात आले होते. टायसननं आपल्या पूर्ण करिअरमध्ये 19 प्रोफेशनल फाईट्स नॉक आऊट जिंकल्या होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे