फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन
प्रतिनिधि : मयुर मांडलिक
नेवासा : नेवासा पोलिस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ४२० या गुन्ह्यातील आरोपीस नेवासा येथील मा. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टाने नुकताच अटक पूर्व जामीन केला आहे
फिर्यादी रवींद्र साहेबराव केदारे या ऊसतोड मुकादमाने कुकडी सहकारी साखर कारखान्यास ऊसतोड मजूर व ऊस वाहतुकीचा करार आरोपी विजय बलभीम आजबे व विशाल विजय आजबे यांच्याशी केला होता मुकादमाने दिलेल्या ८ बैल जोड्या व बैल गाड्या आरोपींनी कारखान्याच्या पट्टा पडल्यानंतर परत केल्या नाही करारत ठरल्याप्रमाणे कामाचा मोबदला न देवून सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत नेवासा पोलिस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता तेव्हा पासुन आरोपी फरार होते दरम्यान आरोपीने अटक पूर्व जामीन मिळण्याकरिता नेवासा येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची नुकतीच सुनावणी झाली आरोपीच्या वकिलांनी सदरचा गुन्हा खोटा असल्याचा युक्तिवाद केला करारात ठरल्या प्रमाणे फिर्यादी मुकादमास मोबदला अदा केल्याबाबतच्या बँकेच्या पावत्या पुरावा म्हणून मा न्यायालयात दाखल केल्या आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा सत्र न्यायालयाने दि १७ मार्च २०२२ रोजी आरोपींना अटी व शर्ती वर अटकपूर्व जामीन केला आरोपीच्या वतीने ॲड अंशाबापू पुंड यांनी युक्तिवाद केला त्यांना ॲड सोमनाथ दहातोंडे ॲड कृष्णा फोफसे व ॲड अशोक आजबे यांनी सहकार्य केले