दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मेंगडेवाडी गावचे सुपुत्र IPS श्री.सुरेश सावळेराम मेंगडे राष्ट्रपती पदकाने सन्मानित

धनंजय मेंगडे पुणे प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावचे सुपुत्र IPS श्री.सुरेश सावळेराम मेंगडे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते सेवेबद्दल राजभवन ,मुंबई येथे समारंभपूर्वक राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार ,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  गृहराज्यमंत्री (ग्रामीण)शंभूराज देसाई ,अतिरिक्त मुख्य सचिव (गृह)आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते .यापूर्वी नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त श्री.सुरेश मेंगडे साहेबांना “पर्यावरण संवर्धन ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल यांच्या हस्ते सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक स्वीकारताना हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे! असे मनोगत व्यक्त केले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे