दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

“या”तालुक्यात धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास….!

श्रीरामपूर प्रतिनिधी। तालुक्यातील बेलापूर येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकु लावला.त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली.खंडागळे यांच्या घरातून जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली. त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केली त्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली. सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला . अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप ,पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे