दौंड तालुक्यातील पाटस येथे विश्वशांती बुद्ध विहारा मध्ये तीन दिवसीय निवासी शिबीर संपन्न….
सनी पानसरे।प्रतिनिधी
पाटस।०४नोव्हेंबर २०२१ ते ०६ नोव्हेंबर २०२१ या तीन दिवसात निवासी शिबीर पाटस येथील विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी संपन्न झाले .या मध्ये 60 कुटुंबानी सहभाग घेतला होता 120 महिला/ पुरुष सहभागी झाले होते, पहिल्या दिवशी आपली कुटुंब व्यवस्था आणि स्वास्थ कसे असावे व महापुरुष कसे घडले त्याचा आदर्श कसा घ्यावा , जीवन मार्गाचा प्रवास कसा होतो ,त्याचे ज्ञान व विपश्यना ज्ञान व मानवी जीवन कृत्य कसे असावे, शांत संयमी प्रसन्न जीवन मनावर कसा ताबा मिळवावा व सुख दुःखावर कसा विजय मिळवतो, सर्वस्वी सुखाचं जीवन कसा जगतो , हा अनुभव बौद्ध विचारवंत महापुरुषांचे गुढ अभ्यासक पाली भाषेवर प्रभुत्व असणारे प्राध्यापक मा. जयदेव जाधव सर यांनी पहिल्या सत्रात साध्या आणि सोप्या भाषेत सर्वांना समजून सांगितले . आपले विचार सर्वांना पाठवून दिले, दुसऱ्या सत्रात सन्माननीय बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक सुभाष तेलगोटे सर यांनी सर्व सामान्य मानव जातीचे कल्याणकारी जीवन बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे विज्ञानावर आधारित कसे असावे आणि त्याचे फायदे आपणास कसे मिळतात समाधान कसे प्राप्त होते आणि जीवन सफल कसे होईल याचा परिपाठ प्रत्यक्ष कृतीतून घडवता येतो याची अनेक उदाहरणे देऊन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा अचूक मार्ग आपल्या व्याख्यानातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .
तसेच तिसऱ्या आणि आणि शेवटच्या सत्रात पाली भाषेचे अभ्यासक महिला संघटक प्रज्ञावंत सौ रुपालीताई जाधव यांनी पराभव सुत्त मानवाच्या जीवनात होणाऱ्या चुका आणि त्याची कारणे त्यावर उपाय जे गौतम बुद्धांनी बारा पराभव सुताची कारणे सांगितली होती म्हणजेच दुःख आहे दुःखाची कारणे अन त्यावर उपाय हे समालोचन सर्वांनाच भावून गेले नंतर कैलास वासी कौसाबाई झुंबर जाधव यांच्या सन्मानार्थ वीर माता वा पत्नी या विधवा यांना दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार हा मोना ताई धीवार प्रा. जयदेव जाधव सर आणि परिवार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर सामाजिक आर्थिक शैक्षणिक मैत्री भावना असणाऱ्या कल्याण मित्र पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत पंढरीनाथ आगळे सर यांच्या स्मरणार्थ सुभाष किसन तेलगोटे यांना समीर आगळे सर आणि त्यांचा परिवार त्यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले तेलगोटे साहेब यांनी भारत सूक्त यावर मार्गदर्शन केले यावेळी पाली भाषेचे प्राध्यापक विचारवंत समीर आगळे सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तीन दिवसीय शिबीर आयोजित विश्वशांती बुद्ध विहार हे आमचे माहेर असल्याचे सांगत भावनेला हात घालत काही भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, यावेळी विश्वशांति विहाराचे अध्यक्ष सुधीर पानसरे , संथापक अध्यक्ष प्रशांत भाऊ पानसरे, भागवत गायकवाड ,वसंत पानसरे, विजय पानसरे ,अनंत पानसरे, गणेश गायकवाड (पत्रकार), चेतन पानसरे ,तेजस पानसरे, अपूर्व पानसरे, प्रणय पानसरे, विहाराचे देखभाल पाहणारे राहुल निकाळजे, राजेश कांबळे, विनोद गोळे बुवा , बुआसो अहिवळे, अंकुश पचान्ग, विजय पाटोळे, भाऊ आव्हाड ,अश्विनी वाघमारे, यांनी शिबिरासाठी दिलेले श्रमदान अतुलनीय होती, तर अलकाताई गायकवाड ,दळवी ताई ,अन्नदाते निलेश कांबळे, प्रकाश ढाले पाटस चे माजी ग्रामपंचायत सदस्य नाव जाहीर न करता दान दिले . या तीन दिवसीय शिबिरामध्ये घरदार विसरून सर्व कुटुंबाने आनंद प्रेरणा, ज्ञान योगा, शांती तर मिळवलीच पण सांस्कृतिक कार्यक्रमास काही महिला पुरुषांनी सहभाग घेऊन अंत , दीप ,भव, प्रमाणे स्वयम प्रकाशित होऊन आनंद घेतला व सर्वांची करमणूक केली व शेवटी सर्वांचे आभार मानून जड अंतकरणाने सर्वाचा निरोप घेण्यात आला . व या पुढेही अशीच शिबिरे आयोजित करण्यात येतील याचे सर्वांना आश्वासन दिले .