हल्ली बाजारात आला रानमेवा आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत
प्रतिनिधी सय्यद मेहराज
कंधार प्रतिनिधी।दमदार पावसामुळे कंधार तालुक्यातील डोंगररांगातील सीताफळाच्या झाडांना फळे लगडली आहेत. त्यामुळे या वर्षी रानमेवा असलेल्या सीताफळांचे उत्पादन वाढणार असून परिसरातील मजुरांना सीताफळ विक्रीतून काही काळ तरी रोजगार मिळणार आहे. सध्या फक्त रानमेवा टोपल्या टोपल्यांत भरून बाजारात विकायला आला. तालुका कंधार डोंगरांनी व्यापला आहे. येथील सीताफळे उत्तम दर्जाची आहेत. कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने ही सीताफळे सेंद्रीय प्रकारात मोडतात. चवीला रसाळ व मधुर असल्याने येथील सिताफळांना मागणी असते. सिताफळ अत्यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत करतात. सिताफळामध्ये खनिजद्रव्ये आणि जीवनसत्वे उपलब्ध करून देण्याची चांगली क्षमता असल्यामुळे ते एक पुरक अन्न आहे. सिताफळाच्या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत. पानांचा वापर कडवट औषधे बनविण्यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. स्वस्तात मस्त असा हा रानमेवा आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर असतो.
दमदार पावसामुळे कंधार तालुक्यातील डोंगररांगातील सीताफळाच्या झाडांना फळे लगडली आहेत. त्यामुळे या वर्षी रानमेवा असलेल्या सीताफळांचे उत्पादन वाढणार असून परिसरातील मजुरांना सीताफळ विक्रीतून काही काळ तरी रोजगार मिळणार आहे. सध्या फक्त रानमेवा टोपल्या टोपल्यांत भरून बाजारात विकायला आला. तालुका कंधार डोंगरांनी व्यापला आहे. येथील सीताफळे उत्तम दर्जाची आहेत. कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने ही सीताफळे सेंद्रीय प्रकारात मोडतात. चवीला रसाळ व मधुर असल्याने येथील सिताफळांना मागणी असते. सिताफळ अत्यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत करतात. सिताफळामध्ये खनिजद्रव्ये आणि जीवनसत्वे उपलब्ध करून देण्याची चांगली क्षमता असल्यामुळे ते एक पुरक अन्न आहे. सिताफळाच्या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत. पानांचा वापर कडवट औषधे बनविण्यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. स्वस्तात मस्त असा हा रानमेवा आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर असतो.