अहमदनगर ब्रेकिंग ! दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर
प्रतिनिधी : मयुर मांडलिक
अहमदनगर : पारनेर पोलिस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३९५, ३९७ या कलमानुसार दाखल गुन्ह्यांतील आरोपीस अहमदनगर येथील मा सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टाने नुकताच जामीन अर्ज मंजुर केला आहे
सुपा गावातील खडकवाडी शिवारातील सुपा ग्रामपंचायतचे चालु असलेले नळ पाणीपुरवठा योजनेचे बांधकामाच्या साईटवर कामगार फिर्यादी कृष्णा दत्तात्रय फोफसे , संतोष कुमार , संजय कुमार हे झोपलेले असताना रात्री बारा च्या सुमारास सुमारे दहा अनोळखी इसमांनी खोलीत येऊन कामगारांना लोखंडी गजाने मारहाण केली सदर मारहाणी मध्ये फिर्यादी च्या पाठीला , संतोष कुमार व संजय कुमार यांच्या डोक्यास व हातास जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याबाबत फिर्यादिने पारनेर पोलिस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ३२६ , ३२४ , १४३ , १४७ , १४८ , १४९ , ३९५ , ३९७ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये पोलिस तपासात मयुर भानुदास बर्डे , नवनाथ संपत शिंदे व इतर आठ आरोपी चे नावे निष्पन्न झाले होते यातील नवनाथ शिंदे हा आरोपी गुन्हा दाखल झाल्या पासून फरार होता दरम्यान आरोपीने अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अहमदनगर येथील मा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जाची सुनावणी झाली आरोपीच्या वकिलांनी सदरचा गुन्हा खोटा आहे असा युक्तिवाद केला आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा सत्र न्यायालयाने आरोपीस अटी व शर्ती वर अटकपूर्व जामीन मंजूर केला आरोपीच्या वतीने ॲड प्रशांत मोरे व ॲड गणेश कावरे यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड देवा थोरवे , ॲड स्नेहल सरोदे व ॲड अंशाबापु पुंड यांनी सहकार्य केले