जांब येथे पंधरा लाख रुपयाचा गुटखा जप्त मुखेङ पोलिसांची मोठी कार्यवाही….
प्रतिनिधी।एम बी कवठेकर
मुखेड प्रतिनिधी। मुखेड तालुक्यातील मौजे जांब येथे दि.२१ सप्टेंबर रोजी दोन ठिकाणी छापे मारून एकूण १५ लाख १२ हजार पाचशे रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. मुखेड पोलिसांनी धाडसी कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मौजे जांब (बु) येथील रहिवाशी आरोपी नागेश दुरणाळे यांच्या घरून गोवा, सितार व राजनिवास नावाचे एकूण ६३ पोते किंमत ३ लाख २६ हजार सातशे रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७८/२१ कलम १८८, २७२,२७३,३२८ भा द वि सह ५९ अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर जांब येथील दुसऱ्या ठिकाणी आरोपी रामराव नागनाथ शिंदे यांच्या घरून नजर आणि आरजे नावाचे एकूण २१० पोते किंमत ११ लाख ८५ हजार आठशे रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७९/२१ कलम १८८ ,२७२,२७३,३२८ भादवी सह ५९ अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना मुखेड पोलिसांनी अटक केली आहे..आजुन काही व्यक्ती अवैद गुटका विक्री करणारे आहेत काय ? ते तपास चालू आहे..
सदर कार्यवाही नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन आनसपुरे, पोलिस जमादार आत्माराम कामजळगे, पोलीस जमदार ज्ञानेश्वर ठाकूर, सिद्धार्थ वाघमारे, मारुती मेकलेवाड, दोसलवार, शिवाजी आडबे, बालाजी दंतापल्ले, योगेश कोकणे यांच्या पथकाने केली आहे.