ई-पेपर
तंबाट्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात लाल चिखल
औरंगाबाद प्रतिनिधी।दिवसेंदिवस तांबट्याला भाव अगदी कवडीमोल मिळत असल्याने, गंगापूर-वैजापूर महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बाजूला शेकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेल्या तंबाटी चा खच पडलेला या आठवड्यात रोजच दिसून येत आहे सरकारने याकडं गांभीर्याने लक्ष घालवून भाव वाढ द्यावी अशी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तंबाटे पिकाची लागवड केली जाते, परंतु सध्या एक महिन्यापासून शेकऱ्यांच्या कष्टाला माती मोल भाव मिळत असल्याने शेतकरी गंगापूर-वैजापूर रस्त्यावर आपल्या घामाचा लाल चिखल रस्त्याच्या दुतर्फा टाकून आपली व्यथा व्यक्त करताना दिसत आहे, याकडं कुणी लक्ष घालून कारवाई करत नसल्याने परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे, किमान खर्च झालेला वसूल व्हावा एवढी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.