दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.

(राहुरी वार्ताहर प्रतिनिधी राहुल बोरुडे )तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आरडगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य माननीय जगदीश मुसमाडे सर हे होते .

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांद्वारे सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त करतांना शिक्षक विद्यार्थिनी तस्लिम शेख हीने मनोगत व्यक्त केले. कॉलेजमधील शिक्षक प्राध्यापक राहुल बोरुडे यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विद्यार्थिनी सायली तनपुरे व कल्याणी दुशिंग यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. दरम्यान शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व प्राध्यापकांना कॉलेजच्या वतीने बॅग भेट देण्यात आली. तसेच आजच्या दिवसासाठी शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांमधे प्राचार्य म्हणून तुषार भांड तसेच उपप्राचार्य म्हणून भूषण आढाव यांनी काम पाहिले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विद्यार्थ्यांनी सर्व क्लासरूम अध्यापनाचे काम केले . विद्यार्थी शिक्षकांनी कॉलेजमधील सर्व शिक्षकांचा सत्कार केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जगदीश मुसमाडे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉलेजमधील सर्व स्टाफ ने मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यावेळेस उपस्थित कॉलेजचे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा.अफ्रोज सय्यद, प्रा. सागर वाघ, प्रा संतोष आनाप, प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा. गौरी म्हसे, प्रा. सोनाली शिरोळे, प्रा . अश्विनी खिलारी, प्रा. स्वाती कोबरने, प्रा वैष्णवी शिरसाठ शिक्षकेतर कर्मचारी हेड क्लार्क सलीम पठाण, आकाश बोर्डे, अमोल पवार सर्व उपस्थित होते.

शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री जगदीश मुसमाडे सर ,प्रशासन अधिकारी मा महेश मुसमाडे सर उपस्थित सर्व प्राध्यापक
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे