दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

खंडाळे येथे आय टी सी मिशन सूनहरा कल यांच्या वतीने बक्षीस वितरण

बाळासाहेब पिसाळ

*आज आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत फिनिश सोसायटी मार्फत खंडाळे गावांमध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. गावठाण मध्ये 50 – 60 महिलांमधून 20 महिलांची निवड करण्यात आली होती, ज्या कंपोस्टिंग करतात, प्लास्टिक होल्डिंग करतात आणि कलेक्शन करतेवेळी प्लास्टिक देतात.*
*अश्या महिलांचा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल, केलेल्या कामाबद्दल सन्मान म्हणून घरगुती वस्तू ज्या किचन मध्ये वापरता येतील अशा वस्तू गिफ्ट म्हणून देण्यात आल्या* *या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सौ. ज्योती नरवडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिका दरवडे आणि इतर महिला सदस्य उपस्थित होते*
*तसेच या कार्यक्रमासोबतच गावामध्ये असणाऱ्या मोहल्ला कमिटीची मिटिंग सुद्धा यातच घेण्यात आली.*
*सर्व महिलांना प्लास्टिक होल्डिंग करण्याबाबत सांगितले.तसेच बाळासाहेब पिसाळ सर यांनी महिलांना सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.* *तसेच इतर सर्व महिलांनी प्लास्टिक होल्डिंग करावे, बाहेर उघड्यावर टाकू नये असे सांगण्यात आले.*
*या मिटिंग साठी 33 महिला उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी फिनिश टीम (संदिप भोरे, बाळासाहेब पिसाळ, राज हरले आणि वर्षा शिंदे) उपस्थित होते.*

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे