दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

खाजगी अवैध वाहतुक करणारे सर्व वाहने हटवली – पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी कारवाई

प्रतिनिधी।गणेश गायकवाड

पाटस प्रतिनिधी। दि. 23 सप्टेंबर, 2021 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दौंड आगारामार्फत चालवण्यात येणा-या फे-या गोलराऊंड येथून चालवील्या जातात त्या ठिकाणी कुरकुंभ, बारामती, फलटण जाणा-या प्रवाशांची गर्दी खुप मोठया प्रमाणात असते त्या ठिकाणीच मोठया प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक केली जाते. त्यामुळे रा. प. महामंडळाचे प्रवाशी उत्पन्न बुडत असून राज्य शासनाचा महसूल देखिल बुडत आहे. गोलराऊंड येथे प्रवाशी निवारा बसस्थानक देखिल आहे. सदरील ठिकाणी बसस्थानकाच्या समोर व आजुबाजूला सर्व खाजगी वाहने लावली जातात त्यामुळे प्रवाशी चढ-उतार करण्यासाठी बस लावण्यासाठी जागा मिळत व चालक वाहकांना दमदाटी व अरेरावी केली जाते असे चालक/वाहकांचे निवेदन व आगार व्यवस्थापक यांचे पञ पोलिस निरीक्षक मा. विनोद घुगे यांना दिले त्यावेळी घुगे साहेबांनी त्वरीत कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
त्यानुसार एका तासाच्या आत मा. घुगे साहेबांनी गोलराऊंड चौकातील सर्व बाजूंची पार्किंग केलेली खाजगी वाहने बाजूला काढली व चौक मोकळा केला त्यामुळे नागरिकांमध्ये व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापक श्री. रामनाथ मगर व सर्व कामगारांनी मा. घुगे साहेबांचे आभार व्यक्त केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे