शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी कुषी उत्पन्न बाजार समितीवर एकजुटीने राहुन विजय मिळऊ-माझी आमदार नागेश पाटील आष्टीकर
बालाजी शाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची बैठक संपन्न
हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर येथील बालाजी शाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक माझी आमदार नागेश पाटील आष्टीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करताना आष्टीकर यांनी असे सांगितले कि शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी आगामी कुषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी , चेअरमन व हमाल मापाडी ह्या सर्वांनी एकजुटीने राहुन कुषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले या बाबत सविस्तर वुत्त असे कि अगोदर देशातील भाजपा कार्यकर्तांना दम दाटी करून हुकुम शाही करत आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील कुषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी होणाऱ्या सर्वत्रित निवडणुकी संदर्भात माझी आमदार नागेश पाटील आष्टीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक हिमायतनगर शहरातील बालाजी विद्यालय पाण्याच्या टाकीजवळ आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे व चेअरमन , सभासद व व्यापारी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी असे सांगितले कि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आपण काम करत आलो आहोत त्यामुळे येणाऱ्या कुषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुध्दा आपल्याला शेतकरी हिताचेच काम करायचे आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहुन आपल्या शिवसेना व राष्ट्रवादीचे पॅनल निवडणुन आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहुन काम करा आपल्या नक्कीच यश मिळेल त्यासाठी कार्यकर्त्यांनी कुठल्याही मत भेद न ठेवता कामाला लागावे असे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थित बैठक बोलताना सांगितले . यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बळीराम देवकत्ते, वसंत सहकारी साखर कारखान्याचे मदनराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पंतगे,दत्तराम पाटील करंजीकर, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद, वडगांव ज चे सरपंच विशाल राठोड , प्रकाश जाधव, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड , तालुका संघटक संजय काईतवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण , शहर अध्यक्ष उदय देशपांडे, इरफान खान, अरविंद सोळंके, सुमेध भरणे, विशाल राठोड, श्रीराम माने पाटील वांगीकर, अवधूत देवसरकर, अरविंद पाटील सिरपल्लीकर,गिरी दळालगीर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश पवार पाटील सोणारीकर, संतोष पुरेवार,संटी कप्पलवाड,राम गुडेंकर, बालु आलेवाड,विक्रम गोपेवाड, आनंद अनगुलवार, लक्ष्मणराव राऊत,गजानन गोपेवाड,संजय माने वाघीकर सह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते