दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

AS मराठी NEWS या वेब चैनलचा प्रथम वर्धापन दिन साजरा

संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान

 

सागर पवार – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

02 एप्रिल 2022 रोजी माणगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे AS मराठी NEWS या वेब चैनलचा प्रथम वर्धापन दिन मुख्य व्यवस्थापकीय संपादक सागर पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला.

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांना पत्रकारिता क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी नुकताच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गुडीपाडवा या मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला AS मराठी NEWS वेब चैनलच्या या वर्धापन दिनानिमित्त सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी चैनलचे मुख्य संपादक अनंत खराडे, मुख्य व्यवस्थापकीय संपादक सागर पवार, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, साई गावचे सरपंच हुसेन रहाटविलकर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे, विलास यादव, चैनलचे पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारिता करीत असतांना पत्रकारांनी काय काळजी घ्यावी ? पत्रकारितेचे नियम आचार संहिता याबद्दल मार्गदर्शन केले. संघटनेचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी पत्रकारिता हे क्षेत्र म्हणावे तेव्हढे सोपे नसून यात मराठी शुद्धलेखन मराठी व्याकरणाकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले. साईचे सरपंच हुसेन रहाटविलकर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे यांनी समाजाचा विकास, उन्नती कल्याण यासाठी पत्रकारिता करावी असे आवाहन केले सर्व पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यसंपादक अनंत खराडे सागर पवार आणी उपसंपादक स्वप्नील ढवण यांनी AS मराठी न्यूजच्या बातमीसाठी आम्ही नेहमी तत्पर राहून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पत्रकारिता करीत असल्याचे सांगितले.

यावेळी विलास यादव, सुदाम शिंदे, उपसंपादक स्वप्नील ढवण, संपादक कोकण विभाग संदेश चौधरी, सहसंपादक मितेश महाले, राकेश देशमुख, सुयोग जाधव, संतोष मोरे, अक्षय जाधव, अभिजीत ढाणीपकर, विवेक चाफेकर, नितेश पवार, जितेंद्र माळी या सर्व पत्रकारांना नियुक्ती पत्र सन्मानपत्र देण्यात आले. डी. टी. आंबेगावे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभाग, जिल्हा तालुका पदाधिकारी, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे