ब्रेकिंग
राशन धारकांची दिवाळी कधी साजरी होणार!! राशन दुकानदारावर सरोवर बीजी चे संकट…
श्री अवधूत खाडे प्रतिनिधी

श्री अवधूत खाडे
तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार सर्व राशन धारकांना दिवाळीचे गोडधोड किंवा आनंदमय वातावरणात दिवाळी व्हावी म्हणून शंभर रुपयाची किट दिलेली होती ती आज पर्यंत राशनधारकांना मिळाली नाही.
मग ही योजना काय सरोवरच्या नावाखाली गायप होणार की काय अशी चर्चा सर्वच राशनधारकांकडून ऐकण्यात मिळत आहे.
राशन दुकानदाराला विचारलं तर राशन दुकानदार सांगतो की पोर्टल अपडेट होत आहे अधिकाऱ्याला विचारलं तर अधिकारी सांगतात की पोर्टल नवीन आलेला आहे सगळं दिवाळीच्या तोंडावरच करायची गरज होती का यासाठी ही जाहिरात केली होती का. अशा अनेक चर्चा राशनधारकाकडून ऐकायला मिळतात गेल्या दोन दिवसापासून राशन दुकानदाराकडे राशन धारकाची रांग ही रांग. त्यात दुकानदाराला विचारलं तर ते सांगतात सरोवर नाही.
मग यावर तालुका पुरवठा अधिकारी काय सोलुशन घेतील का जिल्हाधिकारी काही याच्यावर निर्णय देतील का राशनधारकांना ऑफलाईन वाटप करण्याचे आदेश देतील का?या सर्व गोष्टीकडे आमजनतेचे लक्ष लागले आहे.
सर्व तालुकास्तरीय पुरवठा अधिकाऱ्यांना शासनाने आदेश देऊन सर्व राशन दुकानदारांना ऑफलाईन वाटण्यात परमिशन द्यावे असे अपेक्षा व्यक्त होत आहे पण यावर शासन काय निर्णय घेत याकडे राशन दुकानदार व राशन धारकाचे लक्ष लागलेले आहे.
जर कदाचित सरोवरचे कारण बाजूला ठेवून ऑफलाइन किट वाटप करायची आदेश दिले तर आम जनतेची दिलेल्या आश्वासनानुसार दिवाळी साजरी होईल अशी अपेक्षा करत आहेत.