अहमदनगर (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर प्रत्येकाच्या मनामनात कायम सुरु राहावा या हेतूने विश्व हिंदु मराठा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून नगरची युवा शिवव्याख्याती प्रणाली बाबासाहेब कडुस हिने सुरु केलेला नगरच्या जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची दर रविवारी साफसफाई , नित्यपूजा उपक्रमास दिवसेंदिवस शिवभक्तांचा प्रतिसाद वाढत असून आजच्या महापुजेला सिने अभिनेत्री अश्विनी इरोळे, सिने दिग्दर्शक व लेखक भाऊसाहेब इरोळे, युवासेनेचे विक्रम अनिलभैय्या राठोड यांच्यासह शिवभक्तांनी उपस्थिती लावली.
यावेळी शिरूर येथील पारनेरकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ खोडदे, नगर बाजार समितीचे सहाय्यक सचिव संजय काळे, सौ.सुजाता संजय काळे, शिवव्याख्याते अविनाश गव्हाणे, सौ. उज्ज्वला गव्हाणे, सौ.ज्योती महेश धामणे, श्रावणी जयप्रकाश पाटील, बुरूडगावचे उपसरपंच महेश निमसे, पत्रकार सुनील हारदे, डॉ. बाबासाहेब कडुस, स्वाती कडूस, प्रशांत दरंदले, प्रा.सुनील कोळगे, शिवभक्त राजू शिंदे, नारायण शेरकर, महादेव दहिफळे, कृष्णा राऊत, दीपक झरेकर, पिंपरखेडचे सरपंच कांतीलाल पानसरे, सुधीर पाटील, बापु कुलट, नील हारदे, आदित्य गव्हाणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी पहाटेपासूनच प्रणाली कडूस सह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराची स्वच्छता करून आकर्षक रांगोळी तसेच फुलांची सजावट केली. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार अर्पण करत, महाराजांचा जयघोष करत महाआरती करण्यात आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती यापुढे दर रविवारी नित्यनियमाने सुरु राहणार असून या उपक्रमात जास्तीत जास्त शिवभक्तांनी पुढील रविवारी सहभागी व्हावे असे आवाहन शिवव्याख्याती कु. प्रणाली कडुस हिने केले.