नाव्हा नगरीचे सुपुत्र श्री कृष्णा चांदराव ताकतोडे यांची निवड इंडियन बँकेमध्ये असिस्टंट या पदी झाल्याबद्दल त्यांचे गावातील कर्मचारी मित्र मंडळातर्फे सत्कार समारंभ करण्यात आला. असा सत्कार समारंभाचा कार्यक्रम कर्मचारी मित्र मंडळ हे बरेच दिवसापासून करत आहे यामध्ये नवनव्याने जॉइनिंग झालेल्या सर्वांचे स्वागत करून जे शिकत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं असेही काही मार्गदर्शन करत असतात असाच एक अनोखा कार्यक्रम आज दिपवाळीच्या अवचित्य साधून करण्यात आला त्यामध्ये नव्यानेच लागलेले श्रीकृष्णा चंद्रराव ताकतोडे यांचा शिरपळ व एक किताब देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कर्मचारी मित्र मंडळाचे सर्वच मित्र मंडळ उपस्थित होते असेच परंपरा कंटिन्यू चालून गरीब विद्यार्थ्यांना या कर्मचारी मित्रमंडळाने एक वर्गणीचा भाग ठरवून गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणास सहकार्य करावे अशी काही इच्छा व्यक्त होत आहे.
कर्मचारी वर्गाने प्रत्येकाच्या घरात एक कर्मचारी जन्म घ्यावा असे जर काम केले तर गाव आदर्श होण्यास वेळ लागणार नाही पण अपवादात्मक काहींना राजकारणाचा ध्यास लागलाय हे कर्मचाऱ्यास योग्य वाटत नाही..
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.