दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरब्रेकिंग

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू मयताची ओळख पटविण्याकरीता नेवासा पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे नेवासा पोलिसांचे आवाहन

देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक

नेवासा प्रतिनिधी – अहमदनगर औरंगाबाद रोडवर माळीचिंचोरा शिवारामध्ये शनी मंदीराजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक इसम गंभीर जखमी होवुन मयत झाला आहे.सदर मयत याची अद्याप ओळख पटलेली नाही.

फिर्यादी पो कॉ/1092 योगेश छगन आव्हाड नेवासा पोलीस स्टेशन यांचे फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन गु र नं ८८०/२०२२ भादवी-३०४-आ,२७९,३३७,३३८ सह मोटार वाहन कायदा कलम-१८४,१३४-अ.ब,१७७ प्रमाणे दि.१३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन,सदर गुन्ह्यातील मयत अनोळखी पुरुष वय-२५ ते २७ वर्ष आहे.

मयत याची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही.तरी मयताची ओळख पटविणे आवश्यक आहे.तरी नागरिकांनी सहकार्य करून याबाबत काही माहिती असल्यास त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क करावे असे आवाहन नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना केले आहे.मयताचे वर्णन:-अनोळखी पुरुष वय-अंदाजे 25 ते 27 वर्षे, शरिर बांधा सडपातळ, उंची-165 सेमीअंदाजे, वर्ण सावळा, अंगात निळे, काळे राखडी रंगाचा टि-शर्ट, निळसर रंगाची नाइट पॅन्ट कंबरेला करदोरा त्यास ताईत बांधलेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे